बृहन्मुंबई हद्दीत पुढील महिनाभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बृहन्मुंबई हद्दीत पुढील महिनाभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी

Share This

मुंबई, दि. 24 : ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत आजपासून दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत ड्रोनसारख्या उपकरणांच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे.

दहशतवादी अथवा राष्ट्रविरोधी तत्वांकडून जीवितास आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने ड्रोनसारख्या उपकरणांचा वापर हवाई हल्ल्यांसाठी होऊ शकतो. या कारणांमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका ठरु शकणाऱ्या बाबींना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून यानुसार पुढील महिनाभरासाठी बृहन्मुंबई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदी उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages