मुंबई - ‘एम/पूर्व’ विभाग प्रभाग क्र. १४१ चे तत्कालीन कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार दि.०९ जानेवारी २०२० रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी १८ हजार ५४ पुरुष व १४ हजार ३२ स्त्रिया असे एकूण ३२ हजार ८६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्र. १४१ मधील चार ठिकाणी २८ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी अठरा उमेदवार आपले नशीब अजमावित आहे. मतमोजणी शुक्रवार, १० जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता देवणार मनपा शाळा क्र.१, देवणार कॉलनी, गोवंडी, मुंबई येथे होणार आहे.