पदनाम बदलण्यासाठी पालिका प्रशासनाला लागले तब्बल १४ वर्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2020

पदनाम बदलण्यासाठी पालिका प्रशासनाला लागले तब्बल १४ वर्ष


मुंबई - मुंबई महापालिकेचे चिटणीस हे पदनाम पारसीमध्ये असल्याने ते मराठीत सचिव असे करावे ही १४ वर्षापूर्वी करण्यात आलेली मागणी आता मार्गी लागणार आहे. बुधवारी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत याबाबत हरकतीचा मुद्दा मांडून याकडे लक्ष वेधले. येत्या स्थायी समिती बैठकीपूर्वी यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले. 

मुंबई महापालिकेचा चिटणीस विभाग हा महत्वाचा मानला जातो. या विभागाचे चिटणीस हे पदनाम पारसी भाषेत आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हा मराठीत चालतो. चिटणीस हे पारसी भाषेत बोलले जाते. त्यामुळे चिटणीस ऐवजी सचिव असे करावे, अशी मागणी १४ वर्षापूर्वी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीवर तब्बल १४ वर्षानंतरही प्रशासनाने त्यावर साधा अभिप्रायही दिला नाही. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी पालिका प्रशासनाच्या या उदासितनेबाबत हरकतीचा मुद्दा मांडून लक्ष वेधले. चिटणीस हे पारसी भाषेत संबोधले जात असल्याने ते बदलून सचिव असे मराठीत करण्यात यावे अशी मागणी केली. १४ वर्षापूर्वी नगरसेवकांनी केलेल्या या मागणीबाबत प्रशासनाने आतापर्यंत साधा अभिप्रायही का दिला नाही असा सवाल विचारत प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त केला. या मागणीकडे लक्ष वेधून तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी राऊत यांनी लावून धरली. भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी यांनी हरकतीच्या मुद्दयाला पाठिंबा दिला. १४ वर्षापूर्वी भाजपचे तत्कालीन नगरसेवक गोपाळ शेट्टी यांनी याबाबत सभागृहात मागणी केली होती. मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. चिटणीस हे पदनाम बदलून सचिव असे मराठीत तात्काळ करण्याबाबत आजच्या स्थायी समितीतच निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. येत्या स्थायी समिती बैठकीपूर्वी यावर निर्णय घेतला जाईल असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad