या प्रकरणी नवीन स्मार्ट कार्ड तयार करण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या असल्याबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत असे स्पष्ट करण्यात येते की, अशाप्रकारे नवीन स्मार्ट कार्ड तयार करण्याबाबत निविदा मागविण्याबाबतची किंवा तत्सम कोणतीही कार्यवाही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत तसेच क्षेत्रीय स्तरावर करण्यात आलेली नाही. जनतेने अशा कोणत्याही जाहिरात अथवा विविध प्रसार माध्यमांद्वारे दिशाभुल करणारी प्रकाशने/जाहिराती/बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे. अशाप्रकारे उक्त योजनेसंदर्भात कुठलीही जाहिरात अथवा दिशाभूल करणारी कागदपत्रे निदर्शनास आल्यास उपरोक्त कागदपत्रांसह अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर संपर्क साधावा, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.