महाराष्ट्रात कोरोनाचे ४५ रुग्ण, एकाचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रात कोरोनाचे ४५ रुग्ण, एकाचा मृत्यू

Share This

मुंबई: मुंबईत एक, पिंपरी चिंचवडमध्ये एक व रत्नागिरीत एक असे कोरोनाचे तीन नवे रुग्ण आज आढळून आले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४२ वरून ४५ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात या घडीला करोनाचे ४४ रुग्ण असून सर्वांसाठीच ही चिंतेची बाब बनली आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात असून या निर्णयांचे पालन करणे आता अत्यावश्यक बनले आहे. मुंबईतील एका कोरोनाबाधित रुग्णाचा १७ मार्चला मृत्यू झाला आहे. 

फिलिपाइन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास करून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची तपासणी केली असता कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या रुग्णावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. दुसरा रुग्ण मुंबईत आढळला आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित व्यक्ती अमेरिकेतून परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रत्नागिरीत ५० वर्षीय व्यक्तीचे कोरोना तपासणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ही व्यक्ती दुबईतून जाऊन रत्नागिरीत परतलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा हा पहिला रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अधिकच खबरदारी घेतली जात आहे.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार संबंधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १ हजार २२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :
पिंपरी चिंचवड- १२
पुणे - ८
मुंबई - ७ (मुंबईत एकूण ८ रुग्ण असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे)
नागपूर- ४
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण- प्रत्येकी ३
रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, रत्नागिरी - प्रत्येकी १
एकूण रुग्ण- ४५

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages