पहिल्या दिवशी 2934 केंद्रांवर 3 लाख लोकांना लस दिली जाणारनवी दिल्ली : 16 जानेवारी म्हणजेच, येत्या शनिवारपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅक्सीनेशन प्रोग्रामची सुरुवात करतील. यासोबतच व्हॅक्सीन घेणाऱ्या काही लोकांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बातचीत करतील. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी 2934 केंद्रांवर 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हॅक्सीन दिली जाईल.

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशला सल्ला दिला आहे की, प्रत्येक व्हॅक्सीनेशन सेशनमध्ये लस घेणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त नसावी. तसेच, 10% व्हॅक्सीन रिजर्व ठेवावी, कारण इतके डोस वेस्टेजमध्ये जाऊ शकतात.

देशात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. सरकारने मंगळवारी सांगितले की, लोकांना अद्याप आपल्या मर्जीची व्हॅक्सीन लावण्याचा पर्याय उपलब्ध नसेल.

पहिल्या फेजमध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सला मोफत लस दिली जाईल. यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना लस दिली जाईल. यानुसार, 27 कोटी लोकांना लस दिली जाईल.

सरकारने कोविशील्डचे 1.1 आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस खरेदी केले आहेत. यांना गरजेनुसार, राज्य आणि केंद्रा शासित प्रदेशांमध्ये पाठवले जाईल. कोविशील्ड देशातील 60 मुख्य ठिकाणावर पोहोचला आहे, तेथून लहान-लहान सेंटरवर पाठवला जाईल. तर, कोव्हॅक्सिनची पहिली खेप 12 राज्यांमध्ये पाठवली आहे.

Post a Comment

0 Comments