मुंबईत ५९२ नवीन रुग्ण, ७ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ५९२ नवीन रुग्ण, ७ रुग्णांचा मृत्यू

Share This


मुंबई २ जानेवारी - मुंबईत २४ तासांत ५९२ नवीन रुग्ण आढळले असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २९४६५९ झाली असून एकूण मृतांचा आकडा १११३२ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी शनिवारीदिवसभरात ६९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २७४७६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या ७८९२ अॅक्टीव रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

धारावीत दिवसभरात ०५ नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या ३८१८ झाली आहे. यातील आतापर्यंत ३४८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धारावीत २० सक्रिय रुग्ण आहेत. तर दादरमध्येही दिवसभरात ०६ नवीन रुग्ण सापडले. येथील रुग्णांची संख्या ४७९१ झाली आहे. मात्र यातील ४५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या येथे ८६ अॅक्टीव रुग्ण आहेत. माहिममध्ये ०२ नवीन रुग्ण सापडले असून येथील रुग्णांची संख्या ४६११ वर पोहचली आहे. मात्र यातील ४२५१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव रुग्ण २१६ आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages