मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर, मात्र काळजी घ्या - पालिका आयुक्तांचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2021

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर, मात्र काळजी घ्या - पालिका आयुक्तांचे आवाहन



मुंबई - गेल्या पाच दिवसापासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या स्थिर राहिली असून मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे असे मत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केले आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी असे आवाहनही चहल यांनी केले आहे. कोरोना रुग्णांसाठी ३६८५ बेडही सध्या रिकामे असून ही दिलासा देणारी बाब असल्याचेही चहल यांनी सांगितले.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या पाच दिवसापासून कमी होत आहे. सोमवारी मुंबईत कोरोनाचे ७३८१ रुग्ण आढळले. मंगळवारी ही संख्या घटून ७०७२ वर आली. म्हणजे ३०९ ने रुग्ण कमी झाल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली. दिवसभरात मुंबईत कोरोना रुग्णांसाठी ३६८५ बेड रिकामे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८७ टक्के रुग्ण हे लक्षणे नसल्याचे आढळून आले. गेल्या ७० दिवसात ९५३ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू दर स्थिर असून दिल्ली शहराच्या तुलनेतही कमी असल्याचा दावा चहल यांनी केला आहे. रुग्णवाढीचा दर कमी होत असून ही मुंबईकरांसाठी समाधानाची बाब असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.

सर्वाधिक रुग्ण असणा-या विभागांवर पालिकेने अधिक लक्ष वेधले आहे. पालिकेने अशा ठिकाणी नियमाची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तातडीने शोध घेऊन संबंधितांना क्वारंटाईन केले जाते आहे. खाटांची संख्या, ऑक्सिजन, वेंटिलेटर आदीची पुरेसा उपलब्धता करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad