नाशिक पालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक; २२ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2021

नाशिक पालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक; २२ जणांचा मृत्यूनाशिकः राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असताना रुग्णालयात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असतानाच नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. यावेळी १३१ रुग्ण महापालिकेच्या जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर काही लोकांना हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे.

रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्णालयात सध्या १३१ रुग्ण आहेत. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँकमधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसंच, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

झाकीर हुसेन हॉस्पिटल नाशिक शहरातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल समजले जाते. या ठिकाणी शहरातील नागरिकांसह, जिल्ह्यातील रुग्णांवरही प्रमाणात उपचार केले जातात. या ठिकाणी सध्या १३१ रुग्ण उपचार घेत होते. १७० बेडचं हे हॉस्पिटल असून त्यामध्ये १७ बेड हे व्हेंटिलेटर असे होते. सहा ते सात लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नुकतंच दहा सिलेंडर सिव्हिल हॉस्पिटलमधून या रुग्णालयात आणण्यात आले असून तातडीने त्याची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

२२ रुग्णांचा मृत्यू -
रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने दुर्दैवानं या घटनेमुळे कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या बाबत माहिती दिली आहे. तसंच, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages