मुंबई बाहेरील खाजगी लसीकरण केंद्रांना नो - एंट्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2021

मुंबई बाहेरील खाजगी लसीकरण केंद्रांना नो - एंट्री



मुंबई - मुंबईत लसीकरण केंद्र फक्त मुंबई महापालिका व पालिका प्रशासनाने मंजुरी दिलेल्या खाजगी रुग्णालयातच सुरु आहे. त्यामुळे मुंबई बाहेरील खाजगी लसीकरण केंद्रांना मुंबईत लसीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

मुंबईत २५० लसीकरण केंद्र मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहेत. तर ५० हुन अधिक लसीकरण खाजगी रुग्णालयात सुरु करण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयांना पालिकेने मंजुरी दिली त्यांनाच लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी आहे. तसेच लसीकरण केंद्राबाहेर रुग्णवाहिका तैनात ठेवणे, खाजगी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करताना संबंधित कार्पोरेट कंपन्यांशी सामंजस्य करार करणे बंधनकारक आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येताच कारणे दाखवा नोटीस बजावत मान्यता रद्द करण्यात येईल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी पालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी बॅनर्स होडिंग व पोस्टर्स झळकवण्यास मनाई केली आहे. मात्र तरीही या नियमाचे उल्लंघन करून बॅनरबाजी केली जाते आहे. त्यामुळे अशा बॅनरबाजीला चाप लावण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले उचलली आहेत. खाजगी सोसायटी, निवासी इमारती या ठिकाणी सुरु असलेल्या लसीकरण केंद्राजवळ बॅनर्स होडिंग व पोस्टर्स झळकवण्यास बंदी केली आहे. त्यामुळे यापुढे राजकीय व इतर बॅनरबाजींनी चाप लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad