पार्क केलेली कार अचानक बुडाली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पार्क केलेली कार अचानक बुडाली

Share This


मुंबई - घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. सदर व्हिडिओतील घटना १३ जून रोजी घाटकोपर पश्चिम परिसरात सकाळी घडलेली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी तसेच जखमी झालेले नाही, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीवरून सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर 'आरसीसी' करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या 'आरसीसी' केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी 'कार पार्क' करीत असत. हाच 'आरसीसी' चा भाग खचून त्यावर 'पार्क' केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही. महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजनाही तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. दरम्यान कारच्या या घटनेशी महापालिकेचा दुरान्वये संबंध नाही. ही घटना या भागातील खासगी सोसायटीतील आहे, असे पालिकेने म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages