मुंबई- कोरोनाच्या संकटामुळे सणांवर बंधने आली आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने देवनार कत्तल खान्याला दिवसाला ३०० मोठ्या जनावरांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. कत्तलखाना बकरी ईद निमित्त कत्तलीच्या अनुषंगाने तीन दिवस सुरू ठेवण्यात यावा असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
पालिकेकडून बकरी ईदसाठी जाहिर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार देवनार येथील कत्तलखाना बकरी ईदच्या कत्तलीच्या अनुषंगाने तीन दिवस सुरू ठेवण्यात यावा अशी पालिकेने परवानगी दिली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत लहानमोठ्या जनावरांची कत्तल या कत्तलखान्यात करता येऊ शकेल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. शहरातील मुस्लीमांची संख्या लक्षात घेता दिवसाला एक हजार जनावरांची कत्तल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लीम नागरिकांनी पालिकेकडे केली होती. मात्र पालिकेने दिवसाला ३०० जनावरांचीच कत्तल करण्यास परवानगी दिली आहे. शिवाय उच्च न्यायालयाने कोरोना काळात महापालिकेने देवनारमध्ये कुर्बानीसाठी बनवलेली नियमावली ही योग्यच असल्याचे सांगत मर्यादित संख्येपेक्षा जास्त जनावरांच्या कत्तलीस परवानगी नाकारली आहे. लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
No comments:
Post a Comment