साकीनाका बलात्कार प्रकरणी दोषीवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार कारवाई करा, भीम आर्मीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2021

साकीनाका बलात्कार प्रकरणी दोषीवर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार कारवाई करा, भीम आर्मीची मागणीमुंबई १२ सप्टेंबर २०२१ - साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, कुटुंबियांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासह शासनाची सदनिका द्यावी आदी मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज साकीनाका पोलीस ठाणे येथे जोरदार निदर्शने केली.

पोलीसांनी पिडीतेच्या कुटुंबियांना घेऊन कालच घाईघाईने अंत्यसंस्कार उरकले. यावर भीम आर्मी ने यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी साकीनाका पोलीस ठाणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पुणे अमरावती व गोरेगाव पश्चिम पोलीस ठाणे येथे काहीशा अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा. साकीनाका प्रकरणातील ईतर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन सर्व आरोपींविरोधात 307, 376 भादंवि कलमांसह 302 व अॅट्राॅसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.

साकीनाका पिडीतेला दोन लहान मुली व वृध्द आई असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.तसेच विशेष बाब म्हणून रूपये 50 लाखाचे आर्थिक सहाय्य करावे. पिडीतेच्या कुटुंबियांना शासनाची एक सदनिका द्यावी. गोरेगाव पश्चिम पोलीस ठाणे अंतर्गत मार्च 376/2021 मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यास दिरंगाई करणा-या व अॅट्रोसिटी गुन्हा न लावणा-या संबंधित पोलीस अधिका-यांविरोधात निलंबनाची कारवाई करावी.
अमरावती व पुणे गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी. अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. दरम्यान भीम आर्मीच्या पदाधिका-यांनी यावेळी पिडीतेच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली व या प्रसंगात भीम आर्मी न्याय मिळवून देईल असे आश्वासन देण्यात आले.

भीम आर्मी मुंबईच्यावतीने आयोजित निदर्शनावेळी या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील थोरात, रमेश बालेश ,महासचिव अविनाश कांबळे, मुंबई वरीष्ठ उपाध्यक्ष योगिनी पगारे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad