मुंबईत सोमवार, मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत सोमवार, मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा

Share This


मुंबई - मुंबईत काही दिवसांपासून दमदार पाऊस पडतो आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात सोमवार व मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 
मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात दमदार पाऊस बरसतो आहे. पावसाचा जोर वाढणार असून पुढील तीन दिवस मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघऱ येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages