साकीनाका बलात्कार व मृत्यू - खटला फास्ट ट्रॅकवर चालवा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साकीनाका बलात्कार व मृत्यू - खटला फास्ट ट्रॅकवर चालवा - मुख्यमंत्री

Share This

मुंबई दि ११. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून गृह मंत्री व पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

काय आहे प्रकरण -
शुक्रवारी १० सप्टेंबरला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. पिडीत महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी ११ सप्टेंबरला सकाळी ११.४० वाजता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages