साकिनाका बलात्कार प्रकरण - पीडित महिलेचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साकिनाका बलात्कार प्रकरण - पीडित महिलेचा मृत्यू

Share This


मुंबई - मुंबईतील साकीनाका परिसरात शुक्रवारी रात्री एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे असा अहवाल पोलिसांना दिला आहे.

एकाला अटक -
या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages