फेसबुकचे नाव आता "मेटा" - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेसबुकचे नाव आता "मेटा"

Share This


वॉशिंग्टन : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ (META) या नव्या नावाने ओळखली जाईल. फेसबुकच्या या घोषणेनंतरही, मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून, फेसबुक री-ब्रँडिंग करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली.यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी मेटावर्ससंदर्भात आपल्या व्हिजनवरही भाष्य केले. झुकरबर्ग म्हणाले, आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. तसेच, मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले. नवी होल्डिंग कंपनी मेटा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअ‍ॅप आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी ब्रँड ओकुलस सारख्या अ‍ॅपचाही समावेश करेल. फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये २०२१ मध्ये १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती.

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने घोषणा केली होती, की त्यांचा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी सेगमेंट एवढा मोठा झाला आहे, की आता तो आपल्या उत्पादनांना दोन श्रेणींमध्ये विभागू शकतो. नाव बदलण्याबरोबरच आता कंपनीमध्ये रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. एवढेच नाही, तर मेटावर्ससाठी आपल्याला हजारो लोकांची आवश्यकता आहे, अशी घोषणाही कंपनीने केली होती. सध्या कंपनी १० हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतरही, मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे आणि कंपनी इतर प्रोडक्ट्स जसे, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम कंपनीच्या नव्या बॅनरखाली आणण्याची योजना आहे. आतापर्यंत, वॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामला फेसबुकचे प्रॉड्क्ट्स म्हटले जात होते. मात्र, फेसबुक स्वतःच एक प्रॉडक्ट आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages