डोंबिवली / मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत. त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. यामुळे त्याचे कुटुंबीय नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरनात राहत होता. प्रवाशाला ताप येऊ लागल्याने त्याची कोरोना टेस्ट केली. कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने लॅब कडून याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच परदेशातून आलेला प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णाला पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे टेस्टचे नमुने उद्या जिनोम सिक्वेन्सीग साठी मुंबई येथे प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत. या रुग्णाची प्रकृती व्यवस्थीत आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment