मालाड आप्पा पाडा ते कांदिवली लोखंडवालाचा मार्ग होणार शॉर्टकट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालाड आप्पा पाडा ते कांदिवली लोखंडवालाचा मार्ग होणार शॉर्टकट

Share This


मुंबई - मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या १२० फुटी रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीतील ४०० मीटरच्या पट्ट्यात अडकले आहे. हे काम वन खात्याची परवानगी न मिळाल्याने रखडले होते. याची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नोंद घेत निर्देश दिल्याने हे काम आता मार्गी लागले आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर अप्पा पाडा ते कांदिवली लोखंडवाला प्रवास आता शॉर्टकट्स होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे.

वनविभागाच्या हद्दीत असलेल्या ४०० मीटरच्या रस्त्याची एनओसी वनविभागाकडे गेली अनेक वर्षे अडकली होती. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या १२० फूटी रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, मात्र या भागातील १३०० मीटर रस्त्यांच्या कामापैकी ४०० मीटर रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीत येत होते. या रस्त्याला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने गेली अनेक वर्षे रस्त्याचे काम लालफितीत अडकले होते. आता आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याने मालाड पूर्व जलाशय टेकडी ते मार्गे कांदिवली लोखंडवाला संकुल दरम्यानच्या प्रलंबित रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.

मुंबई महानगर पालिकेने २ नोव्हेंबर रोजी मालाड जलाशय टेकडी ते आप्पापाडा या वनखात्याच्या जागेतून जाणाऱ्या आणि कांदिवली पूर्व लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या सदर ३६.६० मीटर लांब आणि १८.३० मीटर डीपी रोडच्या कामाची निविदा काढली आहे. त्यामुळे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे. भविष्यात मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली पूर्व लोखंडवाला दरम्याचे अंतर कमी वेळात पूर्ण होणार असून नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार असल्याची माहिती मुंबईचे उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages