मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज 30 डिसेंबरला 3671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे 153 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत असल्याने मुंबईकरांचे टेंशन वाढले आहे. (3671 corona 153 omicron patient in mumbai)
कोरोनाचे 3671 नवे रुग्ण -
मुंबईत आज 30 डिसेंबरला 3671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत आठ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज 371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत एकूण 7 लाख 79 हजार 479 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 49 हजार 159 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11 हजार 360 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 505 दिवस इतका आहे. मुंबईमधील 88 इमारती आणि 4 झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.14 टक्के इतका आहे.
या दिवशी रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809, 28 डिसेंबरला 1377, 29 डिसेंबर 2510, 30 डिसेंबर 3671 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
या आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर, 15 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर, 22 डिसेंबर, 25 डिसेंबर, आणि आज 30 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
ओमायक्रॉनचे 153 नवे रुग्ण -
मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले १२ तर जिनोम सिक्वेन्सिंगमधून परदेश प्रवास न करताही पॉजिटीव्ह आलेले १४१ अशा एकूण १५३ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २९० झाली आहे. आतापर्यंत परदेश प्रवास केलेले १३० (८० पुरुष, ५० स्त्री) तसेच १६० (१०५ पुरुष, ५५ स्त्री) अशा एकूण २९० जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण २९० पैकी ७६ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. आतापर्यंत ८२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment