मुंबई - संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच तसेच चर्चगेट स्टेशनजवळ नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.
गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच तसेच चर्चगेट स्टेशनजवळ नितेश राणे यांचे एक बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहिती लिहण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षिस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने अडचणी वाढल्या आहेत. जामीन फेटाळल्यानंतर कोकणात तसेच कणकवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर जामिनासाठी आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठवू अशी माहिती नितेश राणे यांच्या वकिलांनी दिली.
No comments:
Post a Comment