चलो अॅप, बेस्ट स्मार्ट कार्डचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2021

चलो अॅप, बेस्ट स्मार्ट कार्डचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनमुंबई, दि. 21 : बेस्ट उपक्रम तांत्रिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे.‘पुढे चला’ हा मंत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या बेस्टचे काम अभिमानास्पद आहे. आज पर्यायी इंधनाचा विचार करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

चलो अॅप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथी गृह येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ, सुनिल अहिर, बबन कनावजे, राजेश ठक्कर,अनिल पाटणकर, दत्ता नरवणकर,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. 

प्रास्ताविकात बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, 386 पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात असून सन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात शंभर टक्के पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे‘डिजिटल बेस्ट 2.0’ उपक्रमांतर्गत मायक्रो बॅंकिंग, ई-कॉमर्स ट्रेड अशा विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर म्हणाले, बेस्ट पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देत आहे. दुमजली पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करताना अॅपमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बटण देखील कार्यान्वित करावे, अशी सूचना त्यांनी केली.             

यावेळी रवी शेट्टी, सुनील जाधव,व्हिक्टर नागावकर, कृष्णा पोपेरे या वाहतूक विभागातील अधिकारी तसेच अविनाश सापळे आणि दिनेश गारगोटे या बेस्टच्या वाहकांना सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad