मुंबईतील मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या घटली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 December 2021

मुंबईतील मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या घटलीमुंबई - मागील १० वर्षात मुंबईमधील ५० टक्के मराठी शाळा बंद झाल्या आहेत. तसेच या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून अधिक कमी झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत दिली. 

मुंबईमधील मराठी शाळांमध्ये सन २०१०-२०११ मध्ये ४१३ शाळांमध्ये १ लाख २ हजार २१४ विद्यार्थी होते. मात्र २०२०- २०२१ मध्ये ही संख्या २८० शाळांमध्ये ३६ हजार ११४ विद्यार्थी आहेत. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे. 

शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार मुंबईत गेल्या दहा वर्षात निम्म्या शाळा बंद झाल्या असून विद्यार्थी पटसंख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. मराठी भाषेतून शिक्षण देण्यापेक्षा इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे पालकांचा कल असल्याचे यावरून दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad