शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2021

शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशीमुंबई - शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणी वायकर यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आल्याचे समजते.

रवींद्र वायकर हे मंगळवारी दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. ८ तास शिवसेना आमदार रवींद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांना नेमके कोणत्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने ईडीने रविंद्र वायकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असल्याचे समजते. त्यानुसार रवींद्र वायकर हे चौकशीसाठी हजर झाले होते. आज झालेल्या या चौकशीतून आता नेमकं काय बाबी समोर आल्यात, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वायकर हे माजी मंत्री होते. गेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्याच्या ईडी चौकशीचे नेमके कारण काय होते, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र अद्यात या चौकशीबाबात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून कोणत्या प्रकरणी वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते, हे कळू शकलेले नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages