महिला, दिव्यांग, बेघरांसाठी ४० कोटींच्या योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2022

महिला, दिव्यांग, बेघरांसाठी ४० कोटींच्या योजनामुंबई - मुंबई महापालिकेने महिला अर्थसंकल्पाअंतर्गत महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदी बेघरांसाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने यासाठी ४०.६२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदींमुळे या घटकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेने गरीब व गरजू महिलांसाठी १९ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. याअंतर्गत पात्र महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी १०.४९ कोटी रुपये, कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी ४.८० कोटी रुपये, रोजगाराभिमुख प्रशिक्षण ४० लाख रुपये, स्वयंसहाय्यता बचतगटांसाठी खेळते भांडवल ३.२० कोटी रुपये, स्वयंसहाय्य गटांना कर्जावरील व्याजात अर्थसहाय्य २४ लाख रुपये अशी एकूण १०.४९ कोटी रुपये तरतूद केली आहे.

दिव्यांग व्यक्तींची दखल घेण्यात आली असून त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात १४ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. दिव्यांग व्यक्तीना बेस्ट बस भाड्यात १०० टक्के सवलत देण्यासाठी ४.८० कोटी रुपये, स्वयंरोजगारासाठी २.४० कोटी रुपये, स्वयंचलित साईड व्हीलसह स्कुटर देण्यासाठी ४ कोटी रुपये, पात्र दिव्यांग महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी ३.२० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी एक कोटी, रात्र निवारा आधार योजनेसाठी २.६० कोटी रुपये, आधार केंद्रांसाठी १ कोटी ४ लाख रुपयांची तसेच वयोवृध्द, शिशुगृह केंद्र, बेघरांसाठी निवारे यासाठी २.५४ कोटी रुपयांची तरतूद आहे.

गरजू महिलांसाठी - १९ कोटी
दिव्यांगांसाठी - १४.४० कोटी
ज्येष्ठ नागरिकांसाठी - ४.६४ कोटी
वयोवृध्द केंद्र, बेघर निवारे - २.५४ कोटी
रात्र निवारा आधार योजना - २.६० कोटी
दिव्यांग महिल स्वयंरोजगार - ३.२० कोटी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad