फेब्रूवारीअखेर मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2022

फेब्रूवारीअखेर मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल - महापौर



मुंबई - मुंबईमधील रुग्णसंख्या घटत आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईमधील लसीकरण १०० टक्के पूर्ण होईल. यामुळे फ्रेबुवारीच्या अखेरीस मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ही लाट आता ओसरत आहे. रुग्णसंख्या ३०० पर्यंत आली आहे. आता फक्त मुंबईत एकच इमारत सील आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल. यामुळे रुग्णसंख्या अशीच कमी राहिली तर फ्रेबुवारीच्या शेवटी मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल, असे महापौरांनी सांगितले. विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, मात्र जे काही अनलॉक झाले ते सर्व मुंबईकरासाठी केले असेही महापौर म्हणाल्या. मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झाली असली तरी केंद्र आणि राज्य सरकार मास्क घाला सांगत आहे. मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

राज्यात मजूरांचे हाल झाले नाहीत =
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर बोलताना महापाैर म्हणाल्या की, त्यांच्या वक्तव्यावर बोलणार नाही. चीनमधून कोरोना आला आणि सर्व ठप्प झालं. मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची काळजी घेतली. भाजप आणि काँग्रेसच्या वादात पडणार नाही. राज्यात रेल्वे केंद्र सरकार चालवते. ज्या मजूरांना राज्याबाहेर जायचे होते तेव्हा त्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्रातून मजुरांचे जास्त हाल झाले नाहीत, पण त्यांच्या राज्यात जाताना त्रास झाला हे समोर आलं होत याची आठवण महापौरांनी करून दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad