लता दिदींच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण - महापाैर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लता दिदींच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण - महापाैर

Share This

मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाची मागणी केली जातेय. त्यावर बोलताना मी वैयक्तिक म्हणून बोलतेय, लता दिदींची उंची कोणीही मोजू नका. त्या खूप मोठ्या होत्या. त्यांचं स्मारक झाले पाहिजे. केवळ मुंबई, महाराष्ट्रात नाही तर जगभरात स्मारकं व्हायला हवीत. मात्र, भाजपनं या मुद्द्यावरुन वितुष्ट निर्माण केलंय, वादविवाद करुन राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये. भाजप याबाबत छुपं राजकारण करत आहे. भाजपने हे राजकारण थांबवावे असे आवाहन महापौरांनी केले.

भाजपा आमदार राम कदम यांनी लता दिदींच्या पार्थिवार अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली हाेती. त्या मागणीबाबत महापाैर म्हणाल्या की, लतादीदींवरुन वाद घालणारा तथाकथित आमदार आहे, त्याला कळलं पाहीजे की एवढ्या मोठ्या महान गायिकेचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. हे याेग्य नाही अशी खंत महापाैरांनी व्यक्त केली.

फडणविसांची मदत -
फडणविसांनी मला मुंबईत लतादीदींच्या अंत्यदर्शनाला येण्यास मदत केली. त्याचं राजकारण करण्याची गरज नाही. आमच्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हेच सांगतेय. इथे महिलांचा आदर केला जातो. फडणविस यांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला मदत केली, असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages