रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखलपुणे - पुण्याच्या माजी पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात टेलिग्राफ एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबादमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांकडूनही आधी एक गुन्हा दाखल -
रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानेही एक गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकरणी सरकारी वकिलांनी सांगितले होते, नोंदविण्यात आलेला हा गुन्हा पोलिसांच्या नियुक्त्या-बदल्यांतील भ्रष्टाचार, फोन टॅपिंग, कुंटे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय करत असलेल्या तपासाशी संबंधित नाही. तर फोन टॅपिंगशी संबंधित अहवालातील संवेदनशील माहिती सार्वजनिक करण्याबाबत आहे.

Post a Comment

0 Comments