मुंबईतील शाळा मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2022

मुंबईतील शाळा मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणारमुंबई - कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता आटोक्यात आल्याने मुंबईतील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची तयारी शासकीय पातळीवर सुरु झाली आहे. शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी आवश्यक खबरदारी घेऊन, नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील शाळा सुरु करण्यात आल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने सुरु झालेल्य़ा नाहीत. अजूनही ऑफलाईन आणि ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरु आहे. यात मुंबईतील शाळा १०० टक्के क्षमतेने येत्या मार्चपासून सुरु व्हाव्यात, यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोज घटते आहे. मुंबईत कोरोनाच्या दोन भयंकर लाटा पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर डिसेंबरअखेरपासून कोरोनाची सर्वाधिक प्रसार असणारी तिसरी लाट आली. यामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला २५० पर्यंत असणारी दैनंदिन रुग्णसंख्या थेट २० हजारांपार पोहोचल्याने पालिकेसह राज्य सरकारचेही आव्हान वाढले होते. मात्र एका महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आली. सद्यस्थितीत दररोज ३० हजारांपर्यंत चाचण्या होत आहेत. यात १०० ते १५० पर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, चंद्रशेखर चौरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य -
कोरोनापूर्व स्थितीप्रमाणे शाळा सुरू करताना वेळापत्रक, उपस्थिती, अभ्यासेतर उपक्रम, स्कूल बसेसची सुविधा याबाबत चर्चा झाली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोरोना नियम पाळूनच शाळा सुरू होतील, असेही ते म्हणाले. तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राध्यान्य देण्यात येईल. मात्र पालकांच्या संमतीनुसार निर्णय घेण्यात येईल. पालिकेचा शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या सहाय्याने शाळांच्या आवारात १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages