मुंबई महापालिका रुग्णालयात कमी किंमतीत फळे भाजीपाला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२२ फेब्रुवारी २०२२

मुंबई महापालिका रुग्णालयात कमी किंमतीत फळे भाजीपाला



मुंबई - वाढलेले इंधन दर तसेच इतर कारणाने महागाईचे चटके सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे रुग्णालयात भाजी, फळांच्या पुरवठ्यावर याचा फटका बसेल अशी स्थिती होती. मात्र पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना भाजीपाला, फळांसाठी कंत्राटदारांनी महागाईचा विचार न करता त्यांचा स्वस्त दरांत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारी होणा-य़ा स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना पालिकेकडून सकस अन्न पुरविण्यासाठी निविदा मागविल्या जातात. त्यानुसार, २ जानेवारी २०२३ पर्यंतच्या पुरवठ्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील लघुत्तम निविदा सादर करणाऱ्या कंत्राटदाराने गेल्यावेळच्या काही घटकांच्या खरेदी दरांपेक्षा कमी आणि सरासरी बाजारभावापेक्षाही कमी दर दिल्याने त्यास पसंती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला याचा फायदा होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

पालिका रुग्णालयांत भाजीपाला, फळे पुरवठ्यासाठी यापूर्वीही कमी दराने निविदा आल्या असून त्यावर टीकेचा सूर उमटला होता. आताही कमी दरांच्या पुरवठ्याचा प्रस्ताव सादर झाला आहे. यात १५ रुपये ६३ पैसे किलो दराने केळी, ८.४३ रुपये किलो वांगी, ९.४१ रुपये कोबी, १७.८५ रुपये फ्लॉवर, ९.३८ रुपये दुधी, ५ रुपये किलो लाल भोपळा, मोसंबी ४५ रुपये किलो अशा दरांत पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे. यात इतर काही वस्तूही स्वस्त दरात पुरवठा करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS