कोरोना खर्च मिळण्यासाठी पालिकेचा राज्य सरकारला प्रस्ताव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2022

कोरोना खर्च मिळण्यासाठी पालिकेचा राज्य सरकारला प्रस्ताव



मुंबई - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मागील दोन वर्षांत पालिकेने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून मिळण्यासाठी पालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

 मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना झपाट्याने पसरला. त्यानंतर मुंबई महापालिकेने प्रभावी उपाययोजना करून वेगाने आरोग्य सुविधा वाढवल्या. दहा जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा, औषधे, पीपीई कीट्स, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवकांची भरती करण्यात आली. या सर्वांवर मागील दोन वर्षात पालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात खर्च झाला. यामध्ये मार्च २०२० पासून डिसेंबर २०२१ पर्यंत २१ महिन्यांत ३३८२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे २१ महिन्यांत खर्च झालेल्या ३३८२ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती राज्य सरकारने करावी अशी मागणी पालिकेकडून करण्यात आली आहे. याला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

असा झाला खर्च -
मुंबई महापालिकेने कोविडवर २७६४ कोटी सप्टेंबर पर्यंत खर्च केले. तर ५०० कोटी रुपये तिसर्‍या लाटेत खर्च केले आहेत. २७६४ कोटीपैकी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १४१७ तर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १३४७ कोटींची प्रतिपूर्ती करण्यासाठी दावा केला आहे. तर डिसेंबरपर्यंत खर्चाची रक्कम ३३८२ कोटी झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad