युक्रेनमधून आलेल्या २१९ विद्यार्थ्यांची पालिकेने केली राहण्या खाण्याची सोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

युक्रेनमधून आलेल्या २१९ विद्यार्थ्यांची पालिकेने केली राहण्या खाण्याची सोय

Share This


मुंबई - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने अडकलेल्या युक्रेन मधील २१९ भारतीय  विद्यार्थ्यांना रोमानिया येथून घेऊन निघालेले पहिले विशेष विमान शनिवारी रात्री मुंबईत पोहाचले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हे सर्व विद्यार्थी युक्रेनमधील बुकोविनियन राज्य वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या सर्वांच्या राहण्याची, जेवणाची व इतर सर्व सुविधा महापालिकेने मोफत उपलब्ध केल्या आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युक्रेनवर हल्ला झाल्याने अनेक देशातील नागरिक अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्याचे काम सुरू आहे. मुंबई आणि राज्यातील विद्यार्थी तसेच नागरिकही युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नाने मायदेशी आणले जात आहेत. त्यामधील पहिले विमान शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान मुंबई विमानतळावर पोहचले. या विमानातून महाराष्ट्रातील २१९ विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. मुंबईत आलेल्या प्रवाशांपैकी ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत त्यांच्यावर बंधन नाही. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांची मोफत चाचणी करून घरी क्वारंटाईन केले जाईल. त्यांना मानसिक आधार दिला जाईल. तसेच जेवण व इतर सर्व सुविधा महापालिकेने उपलब्ध केल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना जेवण, निवास, आरोग्य तपासणी आदी सेवा महापालिकेतर्फे मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाईल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

राहण्याची केली सोय - 
दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड, कर्नाटक येथील 55 विद्यार्थ्यांचे विमान उद्या रविवारी सकाळी असल्याने नीरंता लॉंज हॉटेल येथे त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी जेवण, पाणी तासवच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून पालिका आणि एपरपोर्ट प्रशासन त्यांची काळजी घेत असल्याचे महापौरांनी सांगितले.

या विभागातील विद्यार्थी -
महाराष्ट्र 24
केरळ 26
गुजरात 50
कर्नाटक 11
राजस्थान 08
तेलंगणा 16
हरियाणा 09
पश्चिम बंगाल 01
उत्तर प्रदेश  02
मध्य प्रदेश 01
पंजाब 01
बिहार  06
छत्तीसगड 02
उत्तराखंड 03
हिमाचल प्रदेश 24
आंध्रप्रदेश 02
दिल्ली    30

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages