लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको - संजय राऊत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2022

लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको - संजय राऊत


मुंबई  - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता स्मारकावरुन राजकारण सुरु झाले आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि लगेच दुसऱ्या दिवशी भाजप नेते राम कदम यांनी स्मारक बांधण्याची मागणी केली आहे. भाजपच्या मागणीवर आता राजकारण होत असल्याचे दिसत आहे.

 लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण करण्यात येऊ नये असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्मारक बांधण्याची मागणी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार राम कदम यांच्या मागणीवर पलटवार केला आहे. आमदार राम कदम यांनी लतादीदींचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता. राऊत म्हणाले की, काही लोकांनी मागणी केली आहे. परंतु त्यांना मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींचे स्मारक हे राजकारण करु नका, लतादीदी आपल्यात आहेत असे संजय राऊत म्हणाले.

लतादीदी या देशाच्या आणि जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक नक्की महाराष्ट्राचे आणि देशाचे सरकार करेल, कारण त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या. तो आपला अनमोल ठेवा होता. लतादीदींचे स्मारक बांधण्याची मागणी होत आहे. परंतु लतादीदी राजकीय व्यक्ती नव्हत्या त्या स्वतः मोठ्या व्यक्ती होत्या. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार केला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

प्रियंका चतुर्वेदींचा राम कदमांवर निशाणा
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीसुद्धा भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर घणाघात केला आहे. शिवसेना आणि लता मंगेशकर यांचे घरगुती आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देश शोकाकुल आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप आमदार राम कदम राजकारण करत आहेत. देश लतादीदींच्या आठवणीत असताना राजकारण केले जात आहे. शिवसेनेकडून जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करण्यात येईल असे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS