मुंबई - आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. आज दुपारी कोर्टात आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणाची सुनावली मुंबई सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी कोर्टाने सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयाने सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यावेळी कोर्टाने काही महत्तपूर्ण निरीक्षणे नोंदवली. सोमय्यांनी जरी हा मदतनिधी पक्षासाठी गोळा केलेला असला तरी ती रक्कम नेमकी किती आहे आणि मदतनिधीची रक्कम कुणाकडे दिली गेली? याची माहिती सोमय्यांनी द्यावी, असं कोर्टाने म्हटलेलं आहे.
आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. पण मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
No comments:
Post a Comment