शिवसेनेच्या मुंबईतील सभेने अनेकांचे भान हरपले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2022

शिवसेनेच्या मुंबईतील सभेने अनेकांचे भान हरपले



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईत सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांना धारेवर धरले. विरोधकांकडूनही मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे. त्यांच्या टीकेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या (Shivsena) मुंबईतील सभेने अनेकांचे भान हरपले आहे. विनाकारण काही लोक तर बरळत आहेत. त्यातच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपले ज्ञान तपासून घ्यावे.

शिवसेनेवर टीका करताना, बेडूक स्वच्छ पाण्यात विहारतो हे त्यांना माहीत नसावे. घाणेरड्या पाण्यात तर गांडूळ असते, असा टोला पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. तसेच पेडणेकर यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला. सध्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापुढे शिवसेनेच्या कालच्या सभेचा आरसा गेला आहे. त्यामुळे त्यांनी जे आव्हान आम्हाला दिले, त्यासाठी आम्हीही तयार आहोत, असे पेडणेकर म्हणाल्या.

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरही पेडणेकर यांनी भाष्य केले. किरीट सोमय्याजी, तुम्ही काय धमक्या देताय का? जो कायदा आहे, जे सत्य आहे ते येईल समोर, असे त्या म्हणाल्या आहे. आता सोमय्या तेजस ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. तेजस काहीएक संबंध नसताना त्यांना या राजकारणात ओढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.

राज ठाकरे (Raj Thackeray) जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या भाषणातून लोकांचे केवळ मनोरंजन होते. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या नवी दिल्लीतील हनुमान चालिसा कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली. `तीन पैशांचा टिंब टिंब टिंब, त्यांना करू देत`, अशा शब्दात पेडणेकर यांनी त्यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या केतकी चितळेला पेडणेकर यांनी फटकारले आहे. मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. ती मनोरुग्ण आहे, अशी टीका त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad