मुंबई - राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असतानाच आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला एक पत्र पाठवण्यात आले आहे. राज्यात पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रासह देशातील इतरही काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि दिल्ली सरकारला केंद्र सरकारकडून पत्र पाठवण्यात आलं आहे. चाचणी,लसीकरण,उपचार,कोरोना रुग्णांचं ट्रॅकिंग आणि नियमांचं काटेकोर पालन या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना या पत्राद्वारे केंद्राकडून राज्य सरकारला करण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्याचेही सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment