IMD च्या माहितीनुसार मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

IMD च्या माहितीनुसार मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रात

Share This


मुंबई - भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सांगितले की मान्सून सामान्य गतीने पुढे जात आहे आणि येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. यासह, हवामान कार्यालयाने १० आणि ११ जून रोजी अरुणाचल प्रदेशात आणि पुढील पाच दिवस आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा (२०४.४ मिमी पेक्षा जास्त) इशारा दिला आहे.

आयएमडीचे आर. जेनामनी म्हणाले की, मान्सून २९ मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झाला आहे आणि ३१ मे ते ७ जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये पोहोचेल.

जेनामनी यांनी पत्रकारांना सांगितले की, मान्सूनला उशीर झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण मुंबईत पोहोचेल. येत्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages