२०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2022

२०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भरमुंबई - प्रवाशांच्या सोईस्कर प्रवासासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील काही स्थानकांमध्ये नवे सरकते जिने बसवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासोबत काही स्थानकांमधील सरकत्या जिन्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मार्च २०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भर पडणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात आणि ज्येष्ठ, गरोदर महिलांना पादचारी पुलावर चढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने स्थानकात नवे सरकते जिने आणि उद्वाहक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक सरकते जिने मध्य रेल्वेवर बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रत्येक सरकत्या जिन्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपये एवढी असून रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला स्थानकांमध्ये १०१ सरकते जिने बसवण्याची मंजुरी देऊ केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad