मुंबईत दिवसभरात १७६५ नवीन रुग्णांची नोंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दिवसभरात १७६५ नवीन रुग्णांची नोंद

Share This

मुंबई - मुंबईत कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. बुधवारी दिवसभरात रुग्णांची संख्या १७६५ वर पोहचली आहे. तर ७३९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी रुग्णसंख्या १२४२ नोंद झाली होती. वाढत्या रुग्णसंख्येने मुंबईकरांची चिंता वाढवली असली तरी यात शून्य मृत्यूची नोंद ही दिलासा देणारी बाब आहे.

मुंबईत मे अखेरपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. मागील आठवडाभरात मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. गेल्या शनिवारी रुग्णांची संख्या ८८९ वर गेली. रविवारी यात आणखी वाढ होऊन रुग्णसंख्या ९६१ पोहचली. सोमवारी ही संख्या काहीशी घटली होती. मात्र मंगळवारी रुग्णांची आकडेवारी १२४२ वर गेली. तर बुधवारी यात मोठी वाढ होत १७६५ वर गेली आहे. यात शून्य मृत्यूची नोंद ही दिलासा देणारी बाब आहे. तर ७३९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ७३ हजार ५४१ झाली आहे. तर दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५६९ वर स्थिर राहिली आहे. तर आतापर्यंत १ लाख ४६ हजार ९७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८६६ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सध्या सात हजार सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दिवसभरात एकूण चाचण्या - १९,१८५
- एक जून ते ७ जून पर्यंत कोविड वाढीचा दर - ०.०७९ टक्के
- २४ तासात रुग्णांच्या संपर्कांत आलेल्यांचा शोध - ८,३५३
- बुधवारी रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण - ८३
- ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या - ११

पाच दिवसांतील रुग्णांची स्थिती -
३ जून - ७६३
४ जून - ८८९
५ जून - ९६१
७ जून - १२४२
८ जून - १७६५

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages