वर्षभरात ३.५ कोटी लोकांनी सिलिंडरच भरला नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2022

वर्षभरात ३.५ कोटी लोकांनी सिलिंडरच भरला नाही



मुंबई - राज्यात एकीकडे सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच सूट देण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ केली. त्यामुळे महागाईविरोधात विरोधक रस्त्यावर उतरत असून, नागरिकही त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारने गरीब महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. मात्र, सिलिंडर महागल्याने गेल्या वर्षभरात जवळपास ३.५ कोटीपेक्षा अधिक लोकांनी सिलिंडरच भरला नसल्याची (3.5 crore people did not fill the cylinder) माहिती समोर आली आहे. मात्र, केंद्र सरकार गॅस सिलिंडर दरवाढीचा धडाका कायम ठेवत आहे.

उज्ज्वला गॅस योजना १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे सुरू करण्यात आली. पीएम उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सरकार दारिद््रय रेषेच्या खालील कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्श्न मोफत देते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने चालवली जाते. या योजनेअंतर्गत एकूण ८ कोटी बीपीएल कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६ कोटीपेक्षा अधिक नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, गतवर्षात या योजनेच्या माध्यमातून सिलिंडर भरण्याची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत असलेल्या गॅस कनेक्शनधारकांपैकी ३ कोटी ५९ लाख कुटुंबांपैकी एकानेही सिलिंडर भरून नेल नाही. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी माहिती दिली.

८ वर्षांत अडीचपट वाढ -
घरगुती सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ झाली. आजवरचे आकडे पाहिले, तर गेल्या आठ वर्षात घरगुती सिलिंडरच्या दरात जवळपास अडीच पटीने वाढ झाली आहे. मार्च २०१४ मध्ये अनुदानित सिलिंडरचा दर ४१० रुपये होता. सध्याच्या वाढीव दरानुसार सिलिंडरसाठी १०५३ रुपये मोजावे लागतात. तसेच पाचकिलोे सिलिंडरच्या किमतीत १८ रुपये वाढ करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad