नवी दिल्ली - एकनाथ शिंदे सरकारविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आज आव्हान याचिका दाखल केली. या याचिकेवर ११ जुलै रोजीच सुनावणी होणार आहे. याच दिवशी शिवसेनेने यापूर्वी दाखल केलेल्या १४ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरही ११ जुलै रोजीच सुनावणी होणर आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर टांगती तलवार कायम आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. जे. के . महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या वतीने अॅड. देवदत्त कामत यांनी कोर्टात बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांची निवड, बहुमत चाचणी तसेच १६ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप आलेला नसताना सरकार स्थापनच कसे काय झाले? असे मुद्दे यातून मांडण्यात आले आहेत. दरम्यान, ११ जुलै रोजी होणा-या आधीच्या सुनावणीतच या याचिकेवरही सुनावणी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
No comments:
Post a Comment