मुंबई - शहरातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १५ दिवसांच्या जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. १६ ते ३० ऑक्टोबरपर्यंत आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असा आदेश पोलीस आयुक्तांनी पोलीस दलाला दिला आहे.
शहरातील शांतता, सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता, मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती असल्याने मुंबई पोलिसांनी येत्या १६ ऑक्टोबरपासून ३० ऑक्टोबरपर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना कुठल्याही समेलनाश प्रतिबंध असेल, कोणत्याही व्यक्ती अथवा पक्षाची मिरवणुक, लाऊडस्पिकर, वाद्य, वाद्यबँड आणि फटाके फोडण्यास बंदी असेल. सर्व प्रकारचे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा, स्मशानभूमी, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, संघटनाच्या कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे, नाट्यगृह, सिनेमागृह, सरकारी आणि निमशासकीय कार्यालयातील कार्यक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थाची कायदे न्यायालये, शाळा, कॉलेजसह इतर शैक्षणिक संस्था, कारखाने, दुकान आणि आस्थापनामधील सामान्य व्यापार, व्यवसायांना आदींना यातून सूट देण्यात आली आहे. या आदेशाची कोणीही उल्लघंन करु नये, पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment