
मुंबई - आज प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते, हिंमत असेल तर मैदानात या, आम्ही तयार आहोत, होऊन जाऊ दे काय ते असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले. शिवसेनेचा जन्मच लढण्यासाठी झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतो आहे. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसे मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र या मैदानात, आम्ही तयार आहोत असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलं आहे.
भुजबळ मुख्यमंत्री झाले असते -
उद्धव ठाकरे म्हणाले की, चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. पण मी सांगतो की छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. एक चांगली गोष्ट भुजबळांनी केली ती म्हणजे बाळासाहेब असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले. त्यावेळी माँ असत्या तर अजून चांगले झाले असते.
No comments:
Post a Comment