मुंबईत ३ दिवसात ८५ आगीच्या घटना, त्यापैकी फटाक्यांमुळे ३७ आगी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ३ दिवसात ८५ आगीच्या घटना, त्यापैकी फटाक्यांमुळे ३७ आगी

Share This

मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी दिवाळीत आगी लागण्याच्या घटना घडतात. २२ ते २४ ऑक्टोबर या ३ दिवसात एकूण ८५ आगीच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यापैकी ३७ आगी या फटाक्यांमुळे लागल्या आहेत. शनिवार पेक्षा रविवारी आणि सोमवारी सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. तर फटाक्यांमुळे सर्वाधिक आगी सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नोंद झाल्या आहेत. मुंबईकरांनी आगी लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई अग्नीशमन दलाकडून करण्यात आले आहे. 

मुंबईत शनिवार पासून दिवाळी सण साजरा केला जात आहे. शनिवारी २२ ऑक्टोबरला १७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २ आगी फटाक्यामुळे लागल्या. रविवारी २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ७ आगी फटाक्यामुळे लागल्या. सोमवारी २४ ऑक्टोबरला ४१ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २८ आगी फटाक्यामुळे लागल्या. दीपावली दरम्यान दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगीच्या घटना नोंद होतात. यंदाही सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसात आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या असल्या तरी त्यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.  

मागील वर्षी १५९ आगीच्या घटनांची नोंद - 
गतवर्षी (२०२१) दीपावली सणाच्या दरम्यान तब्बल १५९ आगीच्या घटनांची नोंद झाली होती. त्यापैकी ४१ आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. तर मागील वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ६५ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ३३ आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. दिवाळीत लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये २०१६ मध्ये लागलेली आग सर्वात मोठी होती. लोअर परळच्या कर्मशिअल कॉम्प्लेक्समध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी चार मजले जळून खाक झाले होते. परंतु सर्व कार्यालयांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यूमुखी झालेले नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages