Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरुच


मुंबई - पगार वाढ, दिवाळी बोनस, बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये मोफत प्रवास आदी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने कंत्राटी चालक आक्रमक झाले आहेत. शनिवारी सांताक्रुझ बस आगारातील मातेश्वरी कंपनीच्या कंत्राटी चालक, वाहकांनी कामबंद आंदोलन केल्यानंतर रविवारी मजास आगारातील कंत्राटी चालक, वाहकांनी कामबंद आदोलन केले होते. आता सोमवारी तिस-या दिवशी मरोळ आगारातील कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना गैरसोईंना सामोरे जावे लागते आहे.

मागील काही महिन्यांत बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी वारंवार आंदोलन केले आहे. आता शनिवारपासून पुन्हा कंत्राटी चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सुरुवातीला सांताक्रुझ आगारातील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यानंतर रविवारी जोगेश्वरी येथील मजास आगार, धारावी आगार, प्रतीक्षा नगर आगारातील कामगारांनी कामबंद आंदोलन केले. आता सोमवारी तिस-या दिवशी मरोळ आगारातील कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मरोळ आगारातील कंत्राटी कामगारांनी केला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत तिस-या दिवशीही प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांसारखा बोनस, पगारवाढ मिळावी ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. त्या सुविधा आम्हाला का मिळत नाहीत असा सवाल विचारत बेस्टचे कंत्राटी कामगारांनी कामबंद केले आहे. ट्रेनिंग कालावधीमध्ये २३ हजार ५०० पगार देणार असे सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात एवढा पगार मिळत नाही. अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या या कंत्राटी चालकांच्या आहेत. बेस्टच्या वाहकाला १८ हजार ५०० रुपये पगार ठरला होता मात्र त्यांना प्रत्यक्षात फक्त १२ हजार ६०० रुपये पगार दिला जातो. नोकरी देताना सहा तास काम करायचे सांगितले होते मात्र काम आठ तासांहून अधिक तास काम करावे लागते असून त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही अशा तक्रारी या कंत्राटी कामगारांनी केल्या आहेत.

यापूर्वी शनिवारी आणि रविवारी देखील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. सुरुवातीला मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. रविवारी, जोगेश्वरीतील मजास आगार, शीव येथील प्रतीक्षा नगर या डेपोंमध्येही कामगारांनी काम बंद आंदोलन केले. या आगारातील कामगारांना बोनसची रक्कम देण्याच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र इतर मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने त्यांच्यामधील नाराजी कायम राहिली आहे.

त्यानंतर, सोमवारी तिस-य़ा दिवशी हंसा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मरोळ आगारातील कामगारांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे बेस्ट बस वाहतूक विस्कळीत झाली असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कामगारांना बोनस व पगाराची ठरलेली रक्कम मिळत नसल्याने कंत्राटी चालकांना कामबंद आंदोलन करावे लागत असल्य़ाचे कामगारांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom