Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गुजरात मोरबी येथील पूल कोसळला, ६० जणांचा मृत्यू


गुजरात / मोरबी - गुजरातमधील मोरबी (Gujrat Morbi bridge collapse) येथे आज (३० ऑक्टोबर) संध्याकाळी साडे सहा वाजता केबल सस्पेन्शन पूल कोसळल्याने सुमारे ४०० लोक मच्छू नदीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू (dead) झाला आहे. मृतांमध्ये १० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. तर ८० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१४० वर्षांहून जुना पूल -
मोरबीचा हा झुलता पूल १४० वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे ७६५ फूट आहे. हा झुलता पूल गुजरातच्या मोरबीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. ते १८८० मध्ये त्यावेळी सुमारे ३.५ लाख खर्चून हा पूल उभारण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलाचे अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.


गर्दीमुळे पुल कोसळला -
गेल्या ६ महिन्यांपासून हा पूल बंद होता. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नुकतेच त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाची क्षमता सुमारे १०० लोकांची आहे, मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यावर सुमारे ५०० लोकांची गर्दी झाली होती. हेच अपघाताचे कारण ठरले. मोरबीचे भाजप खासदार मोहन कुंडारिया यांनी भास्करला सांगितले की, पूल कोसळल्यामुळे लोक जिथे पडले तिथे १५ फूट पाणी होते. या घटनेनंतर गुजरात सरकार खडबडून जागं झालं आहे. सरकारने तातडीने पावलं उचलत या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये पाच जणांचा समावेश असेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom