मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामांची कॅगकडून चौकशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2022

मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामांची कॅगकडून चौकशी

मुंबई - मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. कॅग ही कोणत्याही सरकारी कामांची परीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या ७६ मोठ्या कामाचे ऑडिट करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगने मान्य केली आहे.

या कामांमध्ये कोरोना केंद्रांची उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी प्रकल्प, भिंडीबाजार पुनर्विकास अशा महत्वाच्या कामांचा समावेश यामध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर ही चौकशी म्हणजेच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महानगर पालिकेने उभारलेल्या कोविड केंद्रात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला होता.

दरम्यान येत्या काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचलले आहे. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार या मुद्यावर होणार असंही भाजपने व्यक्त केलं होतं. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार प्रकरणात कोविडची कामे किंवा इतर कामे आहेत का याची चौकशी करण्याची मागणी याआधी भाजपने केली होती.

त्याचबरोबर राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे या मागणीला मान्यता मिळाली असल्याचंही बोलले जात आहे. त्यामुळं कॅगची चौकशी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात कॅगचे अहवाल समोर येऊ शकतात. ज्यामधून कशा प्रकारे मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला की नाही ते समोर येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad