मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2022

मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका



मुंबई - अंधेरी पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केलेला नाही. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी झाली. यावेळी युक्तिवाद करताना ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांनी 2 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली. नियमानुसार आम्ही आमचा राजीनामा मुंबई महापालिकेकडे सादर केला. एक महिन्याचा नोटीस कालावधी पूर्ण न झाल्यास एक महिन्याचे वेतन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे एक महिन्याचा पगार जमा केल्याचे लटके यांच्या वकिलांनी सांगितले.

काय आहे नेमकं प्रकरण ?
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे काय होणार याबाबत संभ्रम होता. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा राजीनामा ३० दिवसांत स्वीकारला जाईल, असे सांगितले होते, यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने त्यांचा राजीनामा उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad