छठ पूजा - कृत्रिम तलाव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2022

छठ पूजा - कृत्रिम तलाव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देशमुंबई - आगामी छठ पूजेसाठी मुंबईत तयारी सुरु आहे. या पूजेसाठी जागोजागी कृत्रिम तलाव तयार करावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेला छठ पूजेसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच कृत्रिम तलाव तयार करावेत असे निर्देश दिले आहेत.

शहरातील नैसर्गिक जलाशय, तलाव यांना बाधा पोहचू नये यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन छठ पूजेसाठी पालिका प्रशासनाने आम्हाला कृत्रिम तलाव उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी एक निवेदन देऊन छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करावेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी देखील मुंबई महानगरपालिकेने छठ पूजेसाठी काही जागी कृत्रिम तलाव तयार करून भाविकांना ती सोय उपलब्ध करून दिली होती. यंदा देखील तशीच सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उत्तर भारतीय बांधवांकडून करण्यात आली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत निर्देश दिले असून पालिका प्रशासनाने ही सोय यंदादेखील छठ पूजेसाठी उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad