आपल्यावर होणा-या आरोपांमुळे सासूचे निधन - किशोरी पेडणेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आपल्यावर होणा-या आरोपांमुळे सासूचे निधन - किशोरी पेडणेकर

Share This


मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झाले आहे. आपल्यावर होणा-या आरोपांमुळे वयस्क सासूबाई यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. (Kishori Pednekar will meet CM Eknath Shinde)

शिवसेनेत बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट पडले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पेडणेकरांवर वारंवार गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. या भेटीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही परवानगी दिलेली आहे. त्यानंतर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख आणि वेळ मात्र अद्याप ठरलेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages